श्रीकांत कारंजेकर - लेख सूची

स्वयंसेवी संस्थाः दशा आणि दिशा

स्वयंसेवी कार्याची परंपरा फार प्राचीन असली तरी तिचे आधुनिक संस्थात्मक स्वरूप समकालीन समाजव्यवस्थेमध्ये उदयास आले आहे. आधुनिक आर्थिक-राजकीय व्यवस्था भांडवलशाही स्वरूपाची असल्यामुळे व तिला कल्याणकारी लोकशाहीप्रधान करण्यापलिकडे (तेही अपूर्णावस्थेतच) भारतामध्ये व इतरत्रही फारसे साध्य करणे अजूनपर्यंत यशस्वी झाले नाही. स्वयंसेवी संस्था व चळवळ यांची दशा व दिशा काय आहे हे समजून घेण्यापूर्वी सध्याची राजकीय स्थिती …

(ख) उद्ध्वस्त माणसंः भारतीय दलितांविरुद्ध जातीय हिंसा

भारतातील दलित समस्या सध्या सौम्य झाली आहे असा आपला समज असतो. जातीयवादी तर सोडाच परंतु पुरोगामी मध्यमवर्ग, ज्यांना दलित समस्येविषयी आस्था आहे, त्यांनासुद्धा काही गोष्टींचा कधीतरी फटका बसलेला असतो व मनामध्ये नापसंतीचा भाव उमटलेला असतो. नागपूरच्या दीक्षाभूमीवरचा धम्मचक्र-प्रवर्तन वर्धापन दिन कार्यक्रम, मुंबईच्या चैत्यभूमीवरील ६ डिसेंबर हा कार्यक्रम व त्यादरम्यानच्या पाचसहा दिवसांच्या कालावधीमध्ये रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये …

मराठी साहित्यविश्व : एक विश्लेषण 

मराठी साहित्यविश्व एका अरिष्टात सापडले आहे. बहुतांश लेखनामध्ये कसदारपणा नाही आणि मोजक्याच चांगल्या साहित्याला वाचक नाहीत. या पार्श्वभूमीवर राजा पिंपरखेडकर यांनी मराठी साहित्याचे परखड मूल्यमापन केले आहे (संदर्भ: ‘उदंड आनंदाचा सोहळा’, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी अंक, 2006) त्याच दरम्यान वसंत आबाजी डहाके यांचा (संदर्भ: ‘स्वातंत्र्यानंतरचे मराठी साहित्य एक लेखाजोखा’, लोकमत दिवाळी अंक, 2006) लेख आला. त्यानंतर …

एकविसावे शतक : बायोगॅस तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

आपल्या देशामध्ये वायोगॅस तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारकार्याला साधारणपणे २० वर्षांचा इतिहास आहे. या २० वर्षांमध्ये एकीकडे बायोगॅस तंत्रज्ञानाने, ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य, अशा पद्धतीने ऊर्जेची व खताची समस्या सोडविण्यामध्ये एक नवा आशावाद जागविला असला, तरी दुसरीकडे गावोगावी उभारलेल्या बायोगॅस-संयंत्रापैकी अनेक संयंत्रे बंद असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानासंबंधी उदासीनता आली आहे व …